सुप्रसिद्ध मेकॅनिक जावेद शेख यांचे निधन

आज दुपारी 12 वाजता रजा नगर येथील राहत्या घरून अंत्ययात्रा

बहुगुणी डेस्क, वणी: येथील रजा नगर निवासी व वणीतील सुप्रसिद्ध मेकॅनिकल जावेदभाई शेख (42) यांचे सोमवार दि. 1 सप्टेंबर रोजी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या वर्षभरापासून ते किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरु होता. प्रकृती खालावल्याने त्यांना काही दिवसांआधी चंद्रपूर व नंतर सावंगी येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र सोमवारी दुपारी सावंगी येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी सकाळी 12 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अंत्ययात्रा त्यांच्या रजा नगर येथील घरून निघणार आहे. एक मृदुभाषी व मनमिळावू स्वभावाचे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. यवतमाळ रोडवर साई मंदिर जवळ त्यांचे गॅरेज होते. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबाचा एकमेव आधार हरपला आहे. त्यांचा मुलगा 12 वी मध्ये लोटी महाविद्यालयातून टॉपर आहे. जावेद यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहेत. वणी बहुगुणी तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Comments are closed.