जेसीआय वणीचा 13 वा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

अध्यक्षपदी नमिष काळे, सचिवपदी डॉ. पूजा काळे यांची निवड

पुरुषोत्तम नवघरे, वणी : जेसीआय वणीचा 13 वा पदग्रहण सोहळा स्थानिक शेतकरी मंदिर हॉल येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात अध्यक्षपदी नमिष काळे तर सचिवपदी डॉ. पूजा काळे यांची निवड जाहीर करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रसाद खानझोडे, झोन 13 चे उपाध्यक्ष नरेन्द्र बरडिया, झोन 13 चे अध्यक्ष सौरभ गट्टानी तसेच ज्ञानेश कांचलावार उपस्थित होते. मावळते अध्यक्ष अभिषेक चौधरी यांनी आपल्या 2025 च्या कार्यकाळातील सामाजिक, व्यावसायिक व नेतृत्व विकास उपक्रमांचा अहवाल सादर केला.

यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष नमिष काळे यांनी पदाची शपथ घेतली. नवीन कार्यकारिणीत व्यवस्थापन संचालकपदी भूषण कोंडावार, खजिनदारपदी तसेच संचालकपदी सुमित कुरेवार, जयंत पांडे, पंकज कासावार, दिपेश झामड आणि साहिल वासेकर यांनी शपथग्रहण केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी जेसीआय इंडिया तर्फे डॉ. अक्षय तुगनायक यांना प्रतिष्ठित “कमळ पत्र” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच नवीन सभासद म्हणून शुभम इंगळे, मधुर झाम, हेमंत झाम आणि डॉ. अमोल लोणारे यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अक्षय तुगनायक, यश श्रीवास्तव, रवि हणमते, मीनल कुरेवार, प्रीती चौधरी आणि प्रशंसा श्रीवास्तव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास जेसीआयचे सदस्य, मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.