शनिवारपासून जेसीआय सप्ताहात भरगच्च कार्यक्रम
विविध स्पर्धांसह रोख रकमेपासून बक्षिसांची लयलूट
बहुगुणी डेस्क, वणीः जेसीआय वणी सिटीचा 17 आणि 18 ऑगस्टला महोत्सव येथील एस. बी. हॉलमधे होत आहे. यानिमित्त विविध स्पर्धांसह भरगच्च कार्यक्रमांची राहणार आहे. शनिवारी दुपारी 4.30 वाजता रांगोळी स्पर्धा होईल. सायंकाळी 5 वाजता बिस्कीट डेकोरेशन स्पर्धा होईल. यात स्पर्धकांना 60 मिनिटांत स्पॉटवर डेकोरेशन करायचे आहे. सायंकाळी 5.30 वाजता आर्ट डिस्प्ले राहील.
संध्याकाळी 5.30 वाजता ड्रॉइंगस्पर्धा वय पाच ते दहासाठी अ-गट आणि वय 11 ते 18 साठी ब-गटात होईल. सोबतच हेल्दी बेबी कॉम्पिटेशनदेखील होईल. लकी लेडी, लकी चाईल्ड आणि एक मिनीट स्पर्धा रोज होईल. सायंकाळी महिला आणि बालकांसाठीच्या विविध स्पर्धा होतील. या साठी नोंदणी सुमित चोरडिया 8796411111, राहुल सुंकुरवार 9096322512, अविनाश पोद्दार 9422146272, सोनू नागदेव 960456144, नीलेश लोया 9623391514 यांच्याकडे करावी.
शनिवारी 6.30 वाजता 14 वर्षांखालील गृप ए आणि ओपन गटाची डान्स कॉम्पिटीशन होईल. विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक अनुक्रमे 2001, 1501 आणि 1001 रूपये दिले जातील. स्पर्धकांना ज्या गाण्यावर डांस करायचा आहे, त्याने पेनड्राईव्हमधे नेमके ते एकच गाणे आणावे. डान्स स्पर्धेची नोंदणी शहाबुद्दीन अजाणी 9850511577, सोहन कोडगिरवार 9822574652 आणि राहुल लाल 9922468166 यांच्याकडे करावी.
रविवारी ‘गीतो के महाबली’ ही गायनस्पर्धा होईल. यात 14 वर्षांपर्यंत ए आणि ओपन बी असे गृप् राहतील. याची प्रवेश फी 100 रूपये आहे. रविवारीच सायंकाळी चार वाजता फॅन्सी ड्रेस कॉम्पिटेशन गट शून्य ते पाच वर्ष आणि गट पाच ते 10 वर्ष अशी होईल. या स्पर्धेत डॉयलॉग म्हणणे आवश्यक आहे. वेळ मर्यादा तीन मिनिटे राहील. दुपारी 4.30 वाजता जागेवर सॅलड डेकोरेशन स्पर्धा होईल. दुपारी याच वेळी शून्य ते पाच आणि पाच ते दहा या वयोगटासाठी पूजा थाळी डेकोरेशन स्पर्धा होईल. दुपारी साडे चार वाजता फायरलेस कुकींग स्पर्धा होईल. यात जागेवर सजावट करायची आहे. स्वीट डीश करायची आहे. या स्पर्धेसाठी 30 मिनीटे वेळ देण्यात आली आहे. स्पर्धांची प्रवेश फी 50 रूपये आहे. रात्री 9 वाजता या सर्व स्पर्धांचं बक्षीस वितरण होईल. या स्पर्धांची नोंदणी जयेश चोरडिया 9421967001, जेसी कुणाल सुंकुरवार 8888857311, जेसी स्वप्निल भंडारी 9421848093, जेसी मोनीश खत्री 9823395939, जेसी नवीन पोपली 8421501502 यांच्याकडे करावी.