युवकांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी पोलिसांची अभिनव संकल्पना

यवतमाळ जिल्हा पोलीस दलाद्वारा ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत वणीत 22 फेब्रुवारीला रोजगार मेळावा

बहुगुणी डेस्क, वणी: कुटुंबातील, नात्यातील किंवा समाजातील सीनियर सदस्य हे युवकांना मार्गदर्शन करीत असतात. मात्र अनेकदा त्यासाठी योग्य पर्याय देत नाहीत. हे करू नको म्हटल्यावर, हे करू शकता असा पर्याय देणे आवश्यक आहे. नेमकी हीच बाब यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने लक्षात घेतली. आणि ऑपरेशन प्रस्थान सुरू केलं.

बेरोजगार युवकांसाठी यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत निशुल्क रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे हा. रोजगार मिळावा शनिवार दिनांक 22 फेब्रुवारीला सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत यवतमाळ रोडवरील शेतकरी मंदिरात होणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सोशल मीडिया, वाईट संगत आणि अन्य कारणांनी यवतमाळ जिल्ह्यातील युवक गुन्हेगारीकडे वळण्याची दाट शक्यता आहे. अनेक युवक हे भरकटलेले आणि वाममार्गाला लागलेले आहेत. काहींनी आपलं शिक्षणदेखील अर्ध्यातच सोडून दिलं आहे किंवा परिस्थितीमुळे त्यांना ते सोडून द्यावं लागलं. त्यांच्यासाठी हा आशेचा एक मोठा किरण ठरणार आहे.

या मेळाव्यात Security guard म्हणजे सुरक्षा रक्षक आणि Security supervisor म्हणजे सुरक्षा पर्यवेक्षक या पदाअंतर्गत युवकांना मोफत मार्गदर्शन केले जाईल. सुरक्षारक्षक पदासाठी उमेदवार आठवी ते बारावी पास किंवा नापास असावा. मुलांची उंची 165 cm आणि मुलींची उंची 155 cm असावी. मुलांसाठी वयोमर्यादा 19 वर्ष तर मुलींसाठी 38 वर्षे राहील. पात्र उमेदवारांना 18,000 ते 22,000 रूपये पगार देण्यात येईल.

उमेदवारांनी येताना शैक्षणिक प्रमाणपत्र, मार्कशीट, आधार कार्ड, मतदान कार्ड, मूळ बँक पासबुक आणि त्याची झेरॉक्स, पोलीस व्हेरिफिकेशन, पासपोर्ट साईजचे सहा फोटो, MBBS डॉक्टरकडून मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आणावे. यात मुलींकरता विशेष सूट देण्यात आली आहे.

उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना कॅपिटल प्रॉटेक्शन फोर्स इंडिया लिमिटेड, हैद्राबाद येथे 21 दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉल, शॉपींग कॉम्प्लेक्स, बँक, कापोरेट कार्यालय, आयटी, आईटीइएस, आवासीय, उद्योग आणि इतर कारखाने, शाळा, दवाखाने, कंपन्या, आतिथ्य, हॉटेल, रिसॉर्ट, वि.आय.पी. सुरक्षा, बुनियादी ढाचा निर्माण कार्यक्रम, एस्कॉर्ट सुरक्षा इत्यादी ठिकाणी सुरक्षा गार्ड, परिवेक्षक म्हणून नेमणूका केल्या जातील.

ही नोकरी वयाच्या 60 वर्षापर्यंत राहील. यामध्ये इपिएफ, इ. एस. आय, ग्रॅज्युटी, बोनस, फॅमिली पेंशन, अपघात विमा व इतर सुविधा प्रदान करण्यात येतील. निवड झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, युनिफॉर्म व बूट इत्यादींसाठी रुपये 8,300 रूपये शुल्क आकारण्यात येईल.

ही संकल्पना यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची आहे. उमेदवारांना यवतमाळचे अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप आणि वणी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे मार्गदर्शन करतील. इच्छुक उमेदवारांनी वणी पोलीस स्टेशनचे PSI सुदाम असोरे 9130035187, पोलीस हवालदार आत्राम 9370137098 यांच्याशी संपर्क साधावा, अशी सूचना आली आहे.

Comments are closed.