महालक्ष्मी अकॅडमीकडून मोफत अबॅकस कार्यशाळा
4 ते 6 एप्रिल दरम्यान आयोजन, मर्यादित जागा, नोंदणी सुरु
पुरुषोत्तम नवघरे, वणी: आपली लेकरं हुशार आहेतच, मात्र अबॅकस या आधुनिक तंत्रामुळे ती अधिक स्मार्ट बनू शकतात. याच उद्देशाने महालक्ष्मी अकॅडमीच्या वतीने उन्हाळी सुटीनिमित्त मोफत अबॅकस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दि. 4, 5 व 6 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेसाठी प्रथम नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार असून, 5 ते 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. मर्यादित जागा असल्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांची नोंदणी लवकरात लवकर करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दिव्या गोरंटीवार (7767894004) व एकता नालमवार (9340023697) यांच्याशी संपर्क साधावा.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत वाढ होऊन स्मरणशक्ती, वैचारिक क्षमता आणि बौद्धिक विकासाला चालना मिळते. अबॅकसच्या साहाय्याने गणित विषय सोपा व रंजक बनतो. छोट्या-छोट्या तंत्रांच्या मदतीने गणित सोडवण्याचा वेग वाढतो, तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही बळकट होतो. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना अबॅकस म्हणजे काय, त्याचा उपयोग कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कठीण वाटणाऱ्या गणिती पद्धती सोप्या करून शिकवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
ही कार्यशाळा दुसरा मजला, श्रीकृष्ण भवन, सिद्धिविनायक मॅचिंग सेंटर जवळ, डॉ. तुगनायत हॉस्पिटल समोर, वणी येथे आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी दिव्या गोरंटीवार (7767894004) व एकता नालमवार (9340023697) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

Comments are closed.