सुशील ओझा झरी: प्रहारचे जिल्हाप्रमुख विलास पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि तालुका प्रमुख आसिफ कुरेशी यांच्या उपस्थितीत जुणोनी येथील ५४ कार्यकर्त्यांनी प्रहार मध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपूर्वीच निमणी तसेच परिसरातील काही कार्यकर्त्यांनी प्रहारमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे झरी तालुक्यात प्रहार मजबूत होताना दिसत आहे.
नियुक्तीमध्ये नेमीचंद टेकाम यांची झरी तालुका सह सचीव तर राजु कूचनकर यांची शाखा प्रमूखपदी नियुक्ती करण्यात आली. प्रहार सेवक- विक्रम संभे, रंधीर जूमणाके, जयंता ताजने, सचिन कुमरे संजय कोडापे, मोहन आरके, सचिन पंधरे अतुल वेट्टी, निलेश तूमराम, पवन दुर्गे, अमोल अलचट्टीवार,सागर मच्चावार, सुभाष टेकाम यांनी सहकार्य केले.
आमदार बच्चु कडु यांच्या कामांनी प्रेरीत होउन तालुक्यातील शेकडो तरुण प्रहार जनशक्ती पार्टी कडे आकर्षीत होत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रहारने याची तयार करण्यास सुरुवात केली आहे. प्रहारचे आमदार बचू कडू यांचा मोठा प्रभाव सध्या तरुणाईवर आहे. त्यातच पांढरकवडा नगरपालिका प्रहारने काबिज केल्यापासून प्रहार अचानक प्रकाशझोतात आला.