उद्या शुक्रवारी वणीत कबीरवाणी, धम्मदेसना आणि व्याख्यान

प्रबोधनपर्वांची मेजवानी आणि तथागत गौतम बुद्धांची 2588वी जयंती

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांनी अखिल विश्वाला प्रज्ञा, शील, करुणेसह जगण्याचा महामंत्र दिला. विश्वरत्न बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हा महान असा बुद्धधम्म सर्वसामान्यांपर्यंत पोहचवला. या वैश्विक विचारांच्या प्रसारार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच महाकारूणिक तथागत गौतम बुद्ध यांची 2588वी जयंती साजरी करीत आहे. यानिमित्त शुक्रवार दिनांक 23 मे रोजी सायंकाळी 6.00 वाजता शिवतीर्थाजवळील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात कबीरवाणी, व्याख्यान, धम्मदेसना अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.

सुरुवातीला बल्लारपूर येथील पवन भगत, डॉ. भावना भगत आणि संच ‘कबीरवाणी’ हा वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यानंतर नांदेड येथील भिक्खू विनय बोधिप्रिय महाथेरो यांचं व्याख्यान होईल.’डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत बौध्द धम्म आणि आपली जबाबदारी’ या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याची विनंती आयोजक डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचनं केली आहे. जर कार्यक्रमाच्या वेळेस अचानक पाऊस आल्यास तोच कार्यक्रम शाळेच्या सभागृहात होईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष बंडू कांबळे, उपाध्यक्ष संजय तेलंग व घनश्याम ठमके, सचिव सतीश वाघमारे, सहसचिव अरूण पेठकर, कोषाध्यक्ष रामदास कांबळे, कार्यकारणी सदस्य प्रा. पुरषोत्तम पाटील, श्रीकृष्ण सोनारखन, दिगांबर पुनवटकर, पुंडलिक पथाडे, नरेश तेलंग, गौतम तेलंग, गौतम धोटे, गोवर्धन तेलतुंबडे, अशोक पळवेकर, रेणुकादास गजभिये, मनोहर ठमके, कवडू जिवने, प्रशांत पथाडे, प्रमोद करमनकर, राजू पुनवटकर, प्रलय तेलतुंबडे, माधुरी वाघमारे, किरण वनकर, माधुरी साखरे व असंख्य धम्मप्रेमी आयोजनात सक्रिय आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.