संत कैकाडी महाराज ४० व्या पुण्यतिथी उत्सवास आरंभ

कीर्तन, अन्नदान, गाथा पारायण, नामजप अनुष्ठान आदी उपक्रम 

0
बहुगुणी डेस्क, पंढरपूर: श्री संत सद्गुरू राजाराम उपाख्य संत कैकाडी बाबा यांचा 40 वा पुण्यतिथी उत्सव भाविकांच्या अलोट गर्दीत आरंभ झाला. 25 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यंत विश्वपुण्यधाम अर्थात कैकाडी बाबांच्या मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी ह.भ.प. कोंडीराम काका यांचा पहाटे पुण्यतिथी उत्सव झाला. त्यांच्या धर्मपत्नी मातोश्री शांताई यांची पुण्यतिथी शनिवारी साजरी झाली. यावेळी ह.भ.प. रामदास उपाख्य शिवदास महाराज यांचे कीर्तन झाले.
सोमवार २९ ऑक्टोबर रोजी संत राजाराम उपाख्य कैकाडी बाबा व मंगळवार  ऑक्टोबर  ३० ऑक्टोबर रोजी मातोश्री विठ्ठलआई यांचा पुण्यतिथी सोहळा होईल. गाथा पारायण व नामजप अनुष्ठान सकाळी 8 ते 11 वाजता, सामुदायिक प्रार्थना दुपारी 4 ते 5 वाजता, हरिपाठ सायंकाळी 5 ते 6 वाजता तर कीर्तन सायंकाळी 6 ते 8 वाजता तर रात्री जागर  होईल. महान तपस्वी श्री संत कैकाडी महाराज यांचे पुतणे ह.भ.प. रामदास उपाख्य शिवराज महाराज जाधव यांचे काल्याचे कीर्तन गुरुवारी 1 नोव्हेंबरला सकाळी 9 ते 11 या वेळेत श्री विठ्ठल रुक्मिणी सभामंडपात होईल.
गाथा पारायण व्यासपीठाचे नेतृत्त्व ह.भ.प. नारायण महाराज गोरे परभणीकर, ह.भ.प. सौ. संगीता हरिभाऊ सोमवंशी पलुसकर करतील. गायनाचार्य ह.भ.प. हरिभाऊ पलुसकर, ह.भ.प. वाल्मिक महाराज सदगीर, ह.भ.प. भाऊसाहेब कुटे, ह.भ.प. दत्ता महाराज सातव, ह.भ.प. तुकाराम महाराज नवसरे, ह.भ.प. परमेश्वर महाराज गोंतेलवार, शहापूर, मा. साधू लामकाने पेनूर, मृदंगमणी ह.भ.प. बाजीराव महाराज कदम, आळंदी देवाची, हे साथ करतील. पानगव्हाणे येथील मुक्ताजी पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. अन्न छत्रालयाची जवाबदारी मनमाडचे मधुकरराव केशवराव पंडित तसेच चाळीसगावचे जगन्नाथ मामा गायकवाड सांभाळतील. नामजप अनुष्ठान हे श्री संत कैकाडी महाराज विश्वपुण्यधाम येथे होईल. गाथा पारायणाचे ठिकाण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सभामंडप आहे.
गाथा पारायण व नामजप अनुष्ठानास बसणाऱ्या भाविकांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. या सोहळ्याचा लाभ घेण्याची विनंती ह.भ.प. दयाघन महाराज बिल्ले, भारत जाधव, अमरजित पाटील, दीपक जाधव, किरण जाधव, योगेश जाधव, महेश माने, अमोल साने, श्रीकांत माने, नीलेश जाधव यांनी केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.