बहुगुणी डेस्क, वणीः किशोरवयीन मुली अनेक शारीरिक आणि मानसिक अडचणीतून जात असतात. त्या आपल्या पाल्यांसोबत या विषयांवर मोकळेपणाने चर्चा करीत नाहीत. त्यामुळे पुढे चालून त्यांना अनेक समस्या निर्माण होतात. यासाठी त्यांचे समुपदेशन व शारीरिक व मानसिक तपासणी करणे तेवढेही आवश्यक आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी किशोरवयीन मुलींसाठी स्थानिक महावीर भवन येथे मोफत मार्गदर्शनाचा कार्यक्रम 22 जुलै रोजी दुपारी 4 ते 6 वाजता आयोजित केला आहे. ‘‘कळी उमलताना’’ या शीर्षकाखाली हा कार्यक्रम होईल.
किशोरवयीन मुलींकरिता ‘‘कळी उमलताना’’ मार्गदर्शन शिबिर दुपारी 4 ते 6 या वेळेत याच ठिकाणी होईल. वयानुरूप शरीरात होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलानंतर घ्यावयाची काळजी याबाबत उपयुक्त असे मार्गदर्शन सुप्रसिद्ध डॉ. गिरीष माने व डॉ. वृषाली माने करतील. मुली व मातांना या मागर्दर्शनाचा लाभ घेता येईल. पालकांनी व मुलींनी या मोफत मार्गदर्शन शिबिरात तसेच दुपारी 1 ते 5 या वेळेत सर्वांसाठी होणाऱ्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरात सहभागी होण्याची विनंती या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी केली आहे.