कन्नमवारांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळा
शनिवारी खा. हंसराज अहिर यांच्या हस्ते होणार अनावरण
विवेक तोटेवार, वणी: देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर सेनाणी व तत्कालीन मध्यप्रांत व विदर्भासह माहराष्ट्राच्या विकासाचा पाया रचणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेबप कन्नमवार यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळा वणीत होणार आहे. शनिवार दिनांक 21 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या ब्रांझ पुतळ्याचं अनावरण आणि लोकार्पण केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावर असणार असून प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारर, वामनराव चटप, माजी आमदार विश्वास नांदेकर, माजी कुलगुरू डॉय भालचंद्र चोपणे. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे. पंचायत समिती सभापती लिशाताई विधाते, अनिल बोरगमवार उपस्थित राहणार आहे.
आज संध्याकाळी भक्तीगितांचा कार्यक्रम
अनावरण सोहळ्याच्या पूर्व संध्येला शुक्रवारी दिनांक 20 एप्रिल ला संध्याकाळी 7 वाजता स्वर साधना मंडळातर्फे भक्ती गितांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर कन्नमवार स्मृती प्रतिष्ठाण द्वारा करण्यात आले आहे.