विवेक तोटेवार, वणी: रविवार 13 मार्चच्या रात्रीच्या सुमारास पेटूर येथील शेतातील बंड्यातून काही बकऱ्या व कापूस अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. ही बाब सकाळी शेतमालकाच्या लक्षात येताच त्यानी वणी पोलिसात याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलोसात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी भास्कर बापूराव कळसकर रा. प्रगतीनगर वणी यांचे पेटूर येथे शेत आहे. शेती सोबतच ते जोडव्यवसाय म्हणून शेळीपालन करतात. त्यांच्या शेतातील बंड्यात 19 बकऱ्या व 2 क्विंटल कापूस ठेवला होता. त्यांचा मुलगा सकाळी जाऊन बकऱ्यांना चारा टाकतो व सायंकाळी बकऱ्यांना बंड्यात बांधून घरी येतो. 13 मार्च रोजी नेहमीप्रमाणे भास्कर यांचा मुलगा हा सायंकाळी 7.30 वाजता बकऱ्यांना बंड्यात ठेऊन कुलूप लावून घरी आला.
14 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास बघितके असता बंड्याचे कुलूप तुटलेले होते व 5 बकऱ्या किंमत 25 हजार व 2 क्विंटल कापूस किंमत 10 हजार असा एकूण 35 हजार रुपयांची चोरी झाल्याचे समजले. भास्कर यांनी त्वरित याबाबत वणी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी भास्कर यांच्या तक्रारीवरून कलम 461, 380 भादंवि नुसार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.
Comments are closed.