राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे महिलांसाठी मोफत कराटे प्रशिक्षण
महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
वणीः आजघडीला दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत आहेत. कुठेही ती सुरक्षित राहिली नाही. पुरुषांच्या तुलतेन बळाच्यादृष्टीनेही तिच्या काही मर्यादा येतात. मात्र कराटेसारख्या आत्मरक्षणाच्या प्रशिक्षणाने ती आत्मरक्षणासाठी समर्थ व सक्षम होऊ शकते. हाच उदात्त हेतू ठेवून राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे महिलांसाठी मोफत कराटे प्रशिक्षण वणी येथे आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेंद्र लोढा व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संगिता अशोक खटोड आणि विजयालक्ष्मी आगबत्तलवार यांच्या मार्गदर्शनात शनिवार दि. 19 मे ते 10 जून 2018 या कालावधीत स्थानिक आदर्श हायस्कूूल येथे सायंकाळी 5 ते 7 दरम्यान हे प्रशिक्षण शिबिर होईल. 6 ते 40 वर्षे वयोगटांतील महिलांना या प्रशिक्षणाकरिता मोफत प्रवेश राहील.
या प्रशिक्षणाच्या सविस्तर माहितीकरिता 7522990499 आणि 9923255825 या क्रमांकावर संपर्क साधावा अशी विनंती करण्यात येत आहे. या आयोजनासाठी डॉ. जयसिंग गोहोकार, वरिष्ठ मार्गदर्शक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राजाभाऊ बिलोरिया, सूर्यकांत खाडे, मत्ते, गणेश कळसकर, जम्बे, स्वप्निल धुर्वे, शम्स सिद्धिकी, संतोष गोमकर, रामकृष्ण वैद्य, सोनू निमसटकर, रमेश मोहिते, सिराज सिद्दिकी, विजय नगराळे, कार्यकर्ते व पदाधिकारी कार्यरत आहेत.