कायरमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

विवेक तोटेवार, वणी: राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, 21 नोव्हेंबर रोजी वणी तालुक्यातील कायर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 75 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कायरचे सरपंच नागेश धनकसार तसेच पेटूरचे सरपंच, सरपंच संघटनेचे अध्यक्ष व भाजपचे महामंत्री प्रवीण झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. नरेश मोडक व पारूल मोडक यांच्या मित्रपरिवारातर्फे आयोजित हे शिबिर कायर ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आले. सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या शिबिराला सायंकाळी 5 वाजेपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चंद्रपूर येथील डॉ. हेडगेवार रक्त केंद्राच्या चमूने रक्त संकलनाची जबाबदारी पार पाडली.

या शिबिराला कायरच्या उपसरपंच माया मोहते, सागर बोथले, सुभाष पिठलावार, महेश गुरनुले, साईनाथ बोरुले, राहुल खरवंडे, शैलेश निकुरे, धर्मेंद्र काकडे, पिंटू गोहकर, सुमित ठेंगणे, गणेश बदखल यांच्यासह अनेक नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. रक्तदान हेच श्रेष्ठदान असल्याचा संदेश देत या उपक्रमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी मोलाचे योगदान देण्यात आले.

Comments are closed.