कायर प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णवाहिकेविनाच 

चार महिन्यांपासून दुरुस्तीला गेलेली रुग्णवाहिका अजून आलीच नाही

0
कायर: तालुक्यातील कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका गेल्या चार महिन्यापासून बेपत्ता झाली आहे. परिणामी प्रसूती झालेल्या महिलांना तसेच इतर रुग्णांना घरी जायला व रुग्णांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी खाजगी वाहनाची सोय करावी लागत आहे.
मागील एप्रिल महिन्यात रुग्णवाहिका दुरुस्तीला नेण्यात आली असतांना येथील वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी कोणताही पाठपुरावा केला नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. रुग्णालया समोरच घाण कचऱ्याचे ढिगारे आहेत. परिणामी सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आरोग्य विभागातच स्वच्छता नसल्याने इतरांचे काय ?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एकूणच परिसरातील गरोदर माता, प्रसूती झालेल्या माता यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर समस्या कडे वरिष्ठांनी लक्ष पुरवावे अशी मागणी कायर येथील  याकुब पठाण, अफजल बेग, शिवा महाकुलकार, महेश गुरनुले, सैय्यद कदीर , मुरतफा सैय्यद, अजय गारघाटे, सुधाकर मडावी यांनी केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.