विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध उपक्रम

खडकी गणेशपूर येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा

0

गिरीश कुबडे, खडकी: झरी तालुक्यातील खडकी (गणेशपूर) येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनासह लोकहिताचे उपक्रम घेण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून अभिवादन सोहळ्यानंतर सर्वधर्मीय सामूहिक विवाहसोहळा 14 एप्रिल रोजी गणेशपूर (बंडा) येथे होत आहे.

गणेशपूर येथे सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर दुपारी 12 वाजता सर्वधर्मीय सामूहिक विवाहसोहळा होईल. या सोहळ्याला उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार लगारे, झरीचे तहसीलदार आर. बी. खिरेकार, गटविकास अधिकारी चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी चव्हाण, मुकुटबन पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गुलाबराव वाघ, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. जी. वारे, खडकी-गणेशपूर गटग्रामपंचायतीच्या सरपंच रत्नमाला संतोष बरडे व मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.

अशा विवाहसोहळ्यात होणारी आर्थिक उधळपट्टी, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी अशा अनेक गोष्टींना फाटा बसतो. मानापमानाचे प्रसंग न येता समता, समानता व सामंजस्य कायम राहते. यावेळी संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक प्रतिष्ठान वणी निर्मित स्वरांगण संगीत संचाची लोकगीतांची मैफल होईल. संयोजक व मुख्य गायक संजय गोडे, सहगायक दिगंबर ठाकरे, चंद्रपूरयेथील प्रसिद्ध ढोलकीवादक मंगेश घडिवार व वादकचमू हे संगीताची संपूर्ण बाजू सांभाळतील. विदर्भातील ख्यातनाम कवी, लेखक व निवेदक सुनील इंदुवामन या कार्यक्रमाचे निवेदन करतील.

आयोजन समितीचे संतोष बरडे, काशिनाथ मालेकार, कुसुम मेश्राम, नंदा गाताडे, सुनंदा बरडे, किरण मालेकर व चमू यशस्वी आयोजनासाठी कार्यरत आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.