मुकुटबन येथे २२,२३ व २४ डिसेंबरला खंजेरी भजन स्पर्धा

0

सुशील ओझा, झरी : तालुक्यातील मुकुटबन येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सुवर्ण महोत्सव पुण्यतिथी व दत्त जयंती निमित्त गुरुदेव सेवा भजन मंडळ, राजराजेश्वर देवस्थान कमेटी व समस्त मुकुटबन ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने २२,२३ व २४ डिसेंबर पर्यंत तीन दिवस राजराजेश्वर देवस्थानात भव्य खंजेरी भजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे उदघाटन २२ डिसेंबरला होणार असून उद्घाटक आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार तर अध्यक्ष म्हणून सरपंच शंकर लाकडे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे जि.प. सदस्य संगीता मानकर, पं.स .सभापती लता आत्राम, उपसरपंच अरुण आगुलवार, माजी पं.स सभापती भुमारेड्डी बाजनलावार, माजी सरपंच प्रमोद बरशेट्टीवार, करम बघेले, चक्रधर तिर्थगिरीकर, संदीप विचू, बापुराव जिंनावार, भुमन्ना एनगंटीवार, झितृ पाटील विधाते, मणीराम कामतवार, लक्ष्मण पारशिवे, रामा संदरलावार, प्रकाश कोगलवार,विजय वारे,धनंजय जगदाळे राहतील.

पुरुष गटाकरिता प्रथम बक्षीस ९००१ रूपयांपासून तर ५०२ रूपयांपर्यंत पंधरावे बक्षीस ठेवण्यात आले आहे. महिला गटाकरिता ५००१ रुपयांचे प्रथम बक्षीस तर ५०१ रुपयांचे चौदावे बक्षीस आहे. बालगटाकरिता ४००१ रुपयांचे प्रथम तर बारावे ५०१ रुपयांचे अखेरचे बक्षिस ठेवण्यात आले आहे. तसेच प्रोत्साहनपर बक्षिसेसुद्धा ठेवण्यात आली आहेत. २२ डिसेंबरला पहाटे ४ वाजता ग्रामसफाई, ध्यान, प्रार्थना, प्रभातफेरी, रामधून व रात्री ८ वाजता भजनस्पर्धेचे उदघाटन होणार आहे. सदर खंजेरी भजन स्पर्धेचे बक्षीस वितरण २४ डिसेंबरला होईल. खंजेरी भजनस्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन कमिटीचे अध्यक्ष अरुण पारशिवे, उपाध्यक्ष विठ्ठल कल्लूरवार, रमेश उदकवार,गजानन अक्केवार, लोकेश पारशिवे, काशीनाथ चिटलावार व वसंता येमजेलवार यांनी केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.