सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५० व्या सुवर्ण महोत्सव पुण्यतिथीनिमित्त गुरुदेव सेवा भजन मंडळ व समस्त मुकुटबन ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने १९, २० व २१ जानेवारी रोजी गुरुदेव सभागृह राममंदिरजवळ खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
खंजिरी व भजन स्पर्धेचे उद्घाटन १९ जानेवारीला होणार असून, उद्घाटक आ. संजीवरेड्डी बोदकुरवार तर अध्यक्ष म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर असणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश वाघ, दामोदर पाटील, सूर्यप्रकाश जयस्वाल, माणिकदास टोंगे महाराज, ज्ञानेश्वर मुडे, डाखरे महाराज, प्रा. संजय पवार, संध्या पवार, रमेश पोतराजवार, धनंजय जगदाळे, विजय वारे, कपिल श्रुंगारे, अरुण सलोडकर.
जि. प. सदस्य संगीता मानकर, पं. स. सभापती लता आत्राम, सरपंच शंकर लाकडे, उपसरपंच अरुण आगुलवार, चक्रधर तीर्थगिरीकर, संदीप बुरेवार, संदीप विचू, भूमारेड्डी बाजनलावार, प्रमोद बरशेट्टीवार, दीपक बरशेट्टीवार, सुरेश मानकर,अनिल पावडे, अशोकरेड्डी बोदकुरवार, गणेश उदकवार,अनिल पोटे, बापुराव जिंनावार, मधुकर चेलपेलवार, सत्तार गुरुजी, व रामलू संदरलावार राहणार आहे.
शहरी पुरुष गटाकरिता प्रथम बक्षीस ११ हजार रुपयांपासून तर ९०० रुपयापयंर्त ठेवण्यात आले आहे. ग्रामीण विभाग पुरुष गटाकरिता ७ हजारापासून तर ९०० रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहे. महिला गटाकरिता ५ हजारांचे प्रथम बक्षीस तर दहावे बक्षीस ९०० रुपयांचे असून, बाल गटाकरिता ५ हजारांचे प्रथम तर दहावे बक्षीस ९०० रुपयांचे अखेरचे ठेवण्यात आले आहे.
१९ जानेवारीपासून पहाटे ४ वाजता ग्रामसफाई व ध्यान प्रार्थना, प्रभातफेरी, रामधून व रात्री ७ वाजता उद्घाटन होणार आहे. भजन मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष डॉ. प्रेमनाथ लोडे, रामदास पारशिवे, शंकर राहुलवार, गजानन पलकोंडवार, सत्यनारायण येमजेलवार, देवराव जिंनावार, मनोज जेऊरकार, विजय थेटे, मनोहर कडुकर व नामदेव जनगमवार यांनी केले आहे..