खरेदी विक्री संघाकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न
खरेदी बंद झाल्यानंतरही तूर आणण्याचा मॅसेज प्रकरण
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे सन २०१९-२० मध्ये नाफेड मार्फत १ एप्रिल ते ३ एप्रिल पर्यंत तूर खरेदी करण्यात आली. ३ एप्रिल पर्यंत ६५ शेतकऱ्यांचे ६८५.१० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. व ४ एप्रिल पासून तूर खरेदी पूर्णतः बंद करण्यात आली. तालुक्यातील ६६४ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. परंतु ६५ शेतकऱ्यांनी तूर विक्री करीता आणल्याचे पाहून उर्वरित ५९७ शेतकऱ्यांना खरेदी विक्री संघाकडून तूर खरेदी बंद असताना शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज टाकून तूर खरेदी केंद्रावर आणण्याचा मेसेज पाठवुन शेतकऱ्याना फसविण्याचा व दिशाभूल करून अनुदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार करीत असल्याची ओरड शेतकऱ्याकडून करण्यात आली.
४ एप्रिलला तूर खरेदी बंद झाल्यावर तूर विक्रीकरिता आनन्याचे मेसेज कश्यासाठी असा संतप्त प्रश्न शेतकरी करीत होते जर शेतकऱ्यांनी तूर विक्रीकरिता आणले असते तर शेतकऱ्यांना किती त्रास झाला असता व परिस्थिती वेगळीच झाली असती असेही बोलले जात होते. खरेदी विक्री संघाने बाजार समितीचे सभापती लक्ष्मण उर्फ संदीप बुरेवार यांना सुद्धा मोबाईलवर मेसेज पाठवून तूर केंद्रावर आणण्याचा मेसेज १२ एप्रिलला दुपारी २ वाजून ४४ मिनिटाला पाठविल्याने सभापती अचंबित झाले व त्यांनी बाजार समितीतीचे सचिव रमेश येल्टीवार यांच्याकडून तूर खरेदी बाबत माहिती घेतली असता ४ एप्रिल पासून तूर खरेदी बंद झाल्याची माहिती येल्टीवार यांनी दिली.
तसेच सभापती बुरेवार त्यांनाही तुरी आणण्याचे बोगस मेसेज मोबाईल वर आल्यावरून खरेदी विक्री संघ किती कामात तत्पर आहे हे पाहून सभापती यांनी खरेदी विक्री संघचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांना तक्रार दिली की तूर खरेदी बंद असतांना मोबाईलवर मेसेज टाकून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. खरेदी विक्री संघ हे शेतकऱ्यांना बोगस मेसेज पाठवुन शेतकऱ्याची संख्या कमी दाखवून शासनाकडून मीळनाऱ्या अनुदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तक्रारीतून केले आहे.तसेच शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे अनुदान बुडवीण्याची तयारी शासनाने केली आहे.
शासनाकडून मागील वर्षीप्रमाणे अनुदान मिळाले नाही व शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले तर याला जवाबदार खरेदी विक्री संघ राहील असे तक्रारीत नमूद केले होते .शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र कुणाचे व खोटे मेसेज टाकून शेतकऱ्यानं फसविण्याचे कार्य कुणाचे असे खोटे मेसेज टाकून फसविणार्या व असे आदेश देणाऱ्याविरुद्ध शेतकऱ्यांत प्रचंड संताप होता.
शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवल्यास मोठे आंदोलन केल्या जाणार अशी तक्रार सभापती संदीप बुरेवार यांनी खरेदी विक्री संघासह वारीष्ठकडे दिली यावरून खरेदी विक्री संघाने स्वतःला वाचविण्याकरिता केविलवाणा प्रयत्न केला असून कृषी उत्पन्न बाजार समितीला खुलासा ( पत्र ) दिले असून पत्रात १ एप्रिल पासून शासनाने दिलेल्या आदेवरून १ एप्रिलच्या तूर खरेदी करीता खरेदीविक्री संघाने ३५ शेतकऱ्यांना मेसेज केले व उर्वरित शेतकऱ्यांना फोनद्वारे कळविले . परंतु तूर खरेदी ऑनलाईन साईड बंद झाल्याने २ व ३ एप्रिलच्या उर्वरित ११५ शेतकऱ्यांना १२ एप्रिलला फोनद्वारे मेसेज करून तूर घेऊन येण्यास सांगितले प्रक्रियेवर ऑनलाइन sms केल्याशिवाय तूर खरेदी व लॉट एन्ट्री होत नाही त्यामुळे तूर खरेदी साईड सुरू होताच १२ तारखेला मेसेज ( sms) पाठविले व बारदाने असेपर्यंत मेसेज केल्याची माहिती बाजार समितीच्या सचिवांकडे खरेदी विक्री संघाने दिली.सदर माहिती मध्ये खरेदी विक्री संघ सारवासारव करीत असल्याचे दिसत आहे .
तूर खरेदी ४ तारखेला बंद झाल्यावर १२ तारखेला ११५ शेतकऱ्यांनाच मेसेज का ? मेसेज तर दुसऱ्यादिवशीही करता आले असते ,तूर खरेदी साईड बंदचा मेसेजशी काय समंध, बारदाने नव्हते तर तीन दिवसाकरिता खरेदी कुणासाठी सुरू केली ? खरेदी बंद होऊन ८ दिवस लोटल्यावर शेतकऱ्यांना तूर विक्रीचे खोटे मेसेज टाकता येते का ? जिल्ह्यात एकमेव मुकुटबन केंद्रावर तूर खरेदी सुरू करण्यात आली त्यातही फक्त ६५ शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली व ५९७ शेतकरी तूर विक्रीपासून वंचित राहिले ज्यामुळे सदर तूर खरेदी शेतकऱ्यांसाठी होती की आपल्या जवळील मित्र शेतकऱ्यांकरिता होती असा संतप्त प्रश्न शेतकरी वर्गाकडून केल्या जात आहे.