विकृताचा बालिकेसोबत अश्‍लील चाळे करण्याचा प्रयत्न

तक्रार दाखल, पोलिसांनी लगेच ठोकल्या बेड्या

जितेंद्र कोठारी, वणी: दुपारची वेळ….. नवीन वर्षाचा पहिलाच दिवस….. केवळ आठ वर्षांची ती निरागस बालिका आपल्या घराजवळ खेळत होती. तिच्यावर एक विकृत नजर ठेवून होता. थोड्या वेळाने आरोपी टक्कू उर्फ प्रभुदास तालावर (40) तिच्याजवळ गेला. तिला त्याने १० रूपयांचे आमिष दाखविले.

Podar School 2025

तो विकृत त्या बालिकेला आपल्या घरी घेऊन गेला. तिच्यासोबत अश्‍लील कृत्ये करण्याचा प्रयत्न करू लागला. याबद्दल कुणालाही काही सांगू नको असे धमकावले. घाबरलेली ती बालिका घरी आली. तिने आपल्या पालकांना या घटनेची माहिती दिली. पालकांनी आरोपी प्रभुदास तालावर याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला लगेच आपल्या ताब्यात घेतले आणि अटक केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कलम 354 (ब), बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण (पॉक्सो) कलम 12 अन्वये आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास सपोनी माधव शिंदे करीत आहे. 

Comments are closed.