लग्नात आलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

आरोपीविरोधात गुन्हा दाखल, मुलीचा शोध सुरू

जितेंद्र कोठारी, वणी: नातेवाईकासह लग्नात आलेल्या एका 16 अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना वणीत घडली. याबाबत वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा व पीडित मुलीचा शोध सुरू आहे.

Podar School 2025

पीडित अल्पवयीन मुलगी ही दोन दिवसांआधी वणीत तिच्या नातेवाईकासह एका लग्नासाठी आली होती. लग्न समारंभात ती मुलगी सहभागी देखील झाली. मात्र नंतर लग्नात ती मुलगी आढळून आली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. मात्र तिचा काही पत्ता लागला नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दोन दिवस नातेवाईक, तिच्या मैत्रिणी यांच्याकडे विचारपूस केली असताही तिचा काही ठावठिकाणा न लागल्याने अखेर गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास तिच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी व मुलीचा शोध सुरू आहे.

हे देखील वाचा:

नेरड जवळ कोळसा भरलेला ट्रक पलटी

अखेर तीन वर्षानंतर होणार चारगाव, शिरपूर, कळमणा रस्ता

Comments are closed.