कोडपखिंडी येथील सिमेंट कॉक्रेट रोडचे काम निकृष्ट
ग्रामवासीयांची बांधकाम विभागाकडे कडे तक्रार
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील कोडपखिंडी येथील सिमेंट रोडच्या कामात भ्रष्टाचार होऊन निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची तक्रार ग्रामवासीयांनी शासकीय बांधकाम विभागाकडे केली आहे. गावात सिमेंट रोडचे काम चालू असून सदर कामात नित्कृष्ठ सिमेंटचा वापर करीत असून इस्टीमेटनुसार काम सुरू नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
सिमेंट रोड बनविणारा कंत्राटदार शासकीय फंडात भ्रष्टाचार करून पैसा हडप करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. तरी सदर रोडची पाहणी करून दोषी कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून दुसऱ्या कंत्राटदाराला काम देऊन दर्जेदार रोड तयार करावे. गावकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा उपोषणाला बसू असा इशारा रोहित भोयर, अरविंद भोयर, नितेश खडसे, वामन मडावी,अनिल खडसे, नामदेव खडसे, श्रीधर आगरकर, रमाकांत गेडाम, सागर राऊत, गजानन येरमे, पवन राऊत, सचिन कुडमेथे, मनोज कुडमेथे, शेखर आवारी, स्वप्नील येरमे, रमेश गेडाम, उमेश्वर आगरकर, मोरेश्वर आगरकर, लक्ष्मण मडावी, प्रमानंद भोयर व गावकऱ्यांनी दिला आहे.