मुकुटबन पोलिसांची कोंबड बाजारावर धाड

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नेरड ते सिंधी-वाढोणा मार्गावर कोंबडबाजार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यावरून सकाळी १०.१५ वाजता पोलीस आपली वाहन घेऊन घटनास्थळी पोहचले असता कोंबड्याला काती बांधून झुंज चालू असल्याचे आढळले.

Podar School 2025

यावरून बाजार भरून खेळत असलेले भाउराव रामदास राखुडें (६६), प्रकाश भाऊराव राखूडें (३०) वर्ष दोघेही रा. नेरड तर बाबाराव तुकाराम थेरे (४०) प्रशांत तुळशीराम ढेंगळे (२५) व संदीप महादेव ताजने (३०) सर्व राहणार पुरड अशा पाच जणांना अटक करून ठाण्यात अाणले व त्यांच्या जवळून दोन कोबंडे किंमत ४०० रुपये, नगदी १ हजार ८१० ,दोन काती ५० रुपये असे एकूण २ हजार २२० रुपये जप्त करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिसांनी वरील पाचही जणांवर कलम १२ ब नुसार गुन्हा नोंद केला असून सदर कार्यवाही ठाणेदार धनंजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक नैताम, रमेश ताजने, रमेश मस्के, नीरज पातूरकर, राम गडदे, मोहन कुडमठे व दिगंबर उपरे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.