विवेक तोटेवार, वणी: 5 डिसेंबर सकाळी 10 वाजता तालुक्यातील कोलार पिंपरी येथील कोंबडबाजारावर डी बी पथकाने धाड घालून आठ आरोपीस अटक केली आहे. यातील काही आरोपी पळून जाण्यात यशस्वी आले. त्यांचे एकूण 22 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे.
पशूंच्या झुंजीवर बंदी असताना तालुक्यातील कोलार पिंपरी येथे कोंबड बाजार सुरू असल्याची माहिती वणी पोलिसांना विश्वसनीय सूत्रानुसार मिळाली. त्यानुसार बुधवारी 5 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकास पाचारण करण्यात आले. डी बी पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारावर घटनास्थळाचा शोध घेतला. ज्या ठिकाणी कोंबड बाजार सुरू होता त्या पिंपरी येथील झुडपी जंगलात धाड टाकली.
पोलिसांना पाहून कोंबड्याच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्यानी सैरावैरा पळण्यास सुरवात केली. डी बी पथकाने यातील आठ आरोपींना पकण्यात यश मिळाले. ज्यामध्ये महादेव बापूराव मंगाम (45), भोजराज हिमराम टोंगे (40), चरणदास रामचंद्र वासेकर (40), पुरुषोत्तम भगवान पोटे (44), विवेक आनंदराव वेले (31), महादेव चिंटूजी सोळंकी (45), दिलीप मारोती सोळंकी (30), मंगेश बंडू भोगेकर याना अटक करण्यात आली. या ठिकाणी उभ्या असलेल्या 22 दुचाकी पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतल्या. सदर आरोपीवर कलम 12(ब) महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या ठिकाणाहून 22 दुचाकी, 4 धारदार कात्या, 6 कोंबडे, नगदी 15220 असा एकूण 10 लाख 87 हजार 250 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई तालुक्यातील सर्वात मोठी कोंबड बाजारावरील कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नि अनुप वाकडे व डी बी पथकातील अजय शेंडे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, , अविनाश बानकर, नितीन सलाम, सुदर्शन वनोळे व चालक सुरेश किनाके यांनी केली.