नागेश रायपुरे, मारेगाव : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना तालुका शाखा मारेगावच्या वतीने दिनांक 5 सप्टेंबरपासून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले. मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनात सहभागी होण्यासाठी नायब तहसीलदार अनमोल कांबळे यांना मुख्यालय सोडत असल्याबबतचे निवेदन दिले आहे.
राज्यभरातील कोतवालांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्यावतीने राज्य शासनाला वेळो वेळी निवेदने देऊनसुद्धा शासनाणी मागण्यांची दखल घेतली नसल्याने संघटनेच्या वतीने दिनांक 3 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर पर्यंत आझाद मैदान मुंबई येथे कोतवालांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन चालू केले आहे. शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास दिनांक 18 सप्टेंबर रोजी मंत्रालयात आपल्या कुटुंबासह आत्मदहन करण्याचा संघटनेने इशारा दिला. मारेगाव तालुक्यातील सर्व कोतवालबांधव आपले काम बंद करुण मुंबई येथील संपात सहभागी होत आहे.
यावेळी सुरेश येरमे, गणेश उराडे, अतुल बोबडे, संदीप कुळसंगे, योगेश भट, अशोक पेंदोर, प्रभाकर चांदेकर, अमित सातपुते, बंडू लोहांडे, शशिकांत निमसटकर, अमित कोयचाडे, प्रभाकर आत्राम आदी कोतवाल बांधव उपस्थित होते.