सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांडवी येथे १ एप्रिल रोजी जि.प. प्राथमिक शाळा येथे कोव्हिड १९ लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. लसीकरण केंद्र उदघाटनाचेअध्यक्ष तहसीलदार गिरीश जोशी होते. तर उद्घाटन पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती गजानन मुंडकर गटविकास अधिकारी पं.स., तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन गेडाम पाटणच्या ठाणेदार कुमारी संगीता हेलोंडे, डॉ.आरती माने, ता.आरोग्य अधिकारी, डॉ. नेहा चवरडोल, वर्षा घानोडे आरोग्य सेविका, मडावी आरोग्य सेविका, गेडाम आरोग्य कर्मचारी व मांडवी येथील माजी मुख्याध्यापक नरसिंगराव सुरावार ह्यांच्या हस्ते लसीकरणाची सुरुवात करण्यात आली.
मांडवी येथील १०० लोकांना लसीकरण करण्यात आले. सर्वांनी कोविड १९ ची लस घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
हे देखील वाचा: