‘अग्निपथ’ योजना त्वरित मागे घेण्याची क्रांती युवा संघटनेची मागणी

प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री याना दिले निवेदन

जितेंद्र कोठारी, वणी : केंद्र सरकारने नुकत्याच घोषित केलेल्या अग्नीपथ योजनेविरोधात देशभरातसह राज्यातूनही विरोध केला जात आहे. केवळ चार वर्षांच्या कंत्राटी पद्धतीवर सैन्याची भरती होणार असेल तर सैनिक होण्यासाठी अनेक वर्षे मेहनत घेतलेल्या तरुणांनी चार वर्षानंतर काय करायचं, असा सवाल उपस्थित करत येथील क्रांती युवा संघटनेने केंद्र सरकारने अग्निपथ योजना त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे.

उपविभागीय अधिकारी वणी मार्फत प्रधानमंत्री, भारत सरकार, गृहमंत्री, भारत सरकार व मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांच्याकडे क्रांती युवा संघटनेने सोमवार 20 जुन रोजी मुद्देसूद विषय घेऊन निवेदन पाठविले. यात केवळ चार वर्षांच्या कंत्राटी पद्धतीवर सैन्याची भरती होणार असेल तर सैनिक होण्यासाठी अनेक वर्षे मेहनत घेतलेल्या तरुणांनी चार वर्षानंतर काय करायचं, असा सवाल विचारला आहे. तसेच 17 ते 23 वर्ष हे तरुणांचे उमेदीचे वर्ष असून 24 किंवा 25 व्या वर्षी निवृत्त होऊन या तरुणांनी पुढे काय करायचे? असा संतप्त सवालही क्रांती संघटनेने केला आहे.

उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना क्रांती युवा संघटनेचे अध्यक्ष ऍड. सुरज महारतळे, राकेश खुराणा, कपिल जुनेजा, वैभव खडसे, ऍड. शबनम महारतळे, सौरभ देरकर, राजू गव्हाणे, अनिकेत सुरपाम, आकाश जीवतोडे, अतिष पेंदोर, प्रथमेश मडावी, वैभव चटपल्लीवार उपस्थित होते.

Comments are closed.