परिवर्तन पॅनलच्या निवडणूक कार्यालयाचे थाटात उदघाटन

वणी विधानसभा काँग्रेस पक्षाचा परिवर्तन पॅनलला सक्रिय पाठिंबा

बहुगुणी डेस्क : येथील प्रतिष्ठित श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीत आघाडीवर असलेल्या परिवर्तन पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे सोमवारी दिनांक 20 जून रोजी थाटात उदघाटन करण्यात आले. येथील आबड भवनमध्ये सुरु करण्यात आलेल्या कार्यालयाचे उदघाटन काँग्रेस नेते डॉ. महेंद्र लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वणी शहर काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

परिवर्तन पॅनलला माजी आमदार वामनराव कासावार यांचा पाठिंबा आहे. संस्थेवर परिवर्तन पॅनलचे संचालक निवडून आणण्यासाठी वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व कांग्रेस कार्यकर्ता उमेदवारासोबत प्रचारार्थ उतरले आहे. यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष वंदना आवारी, वणी तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या बोबडे, वणी शहर महिला अध्यक्ष सविता ठेपाले महिला कार्यकर्त्यासोबत परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे.

Podar School

मतदानाला फक्त 5 दिवस उरले असता परिवर्तन पॅनलने प्रचारात आघाडी घेल्याचे दिसून येत आहे. पतसंस्थेच्या 17 संचालकाच्या निवडीसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. तब्बल 800 कोटींची ठेवी असलेल्या या पत संस्थेवर मागील अनेक वर्षांपासून काळे गटाचा ताबा आहे. रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या यशामध्ये शेकडो दैनिक बचत अभिकर्त्यांच्या मोठा वाटा आहे. मात्र विद्यमान संचालक मंडळ कडून या अभिकर्त्याना दुय्यम वागणूक दिली जात आहे. त्यामुळे पतसंस्थेच्या 15 शाखा मधील नाराज शेकडो अभिकर्ता परिवर्तन घडवूनआणण्याचा तयारीत आहे.

परिवर्तन पॅनेलच्या प्रचार कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी डॉ. महेंद्र लोढा, प्रमोद वासेकर, प्रमोद निकुरे, राजाभाऊ बिलोरिया, संजय खाडे, जयकुमार आबड, वंदना आवारी, संध्या बोबडे, सविता ठेपाले, मंगला झिलपे, मंदा बांगरे, विजया आगबतल्लवार , सुरेखा वडीचार, ललिता बाशेटीवर, माया कोरडे व परिवर्तन पॅनेलचे उमेदवार उपस्थित होते.

Sunrise
Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!