क्रांतिदिन आणि आदिवासीदिनानिमित्त रानभाजी महोत्सव साजरा

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषी अधिकारी यांचे आयोजन

0

सुशील ओझा, झरी: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि तालुका कृषी अधिकारी झरीजामणी अंतर्गत ९ ऑगस्टरोजी क्रांतीदिन व जागतिक आदिवासीदिन साजरा झाला. यानिमित्त रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

Podar School 2025

यावेळी झरी तालुक्याचे पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार व उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच सभापती व उपसभापती यांच्या हस्ते उपस्थित स्टॉलधारक शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रानभाज्यांबाबत संबधित शेतकऱ्यांना कृषिमित्रांकडून माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात बदखल साहेब, तालुका कृषि अधिकारी झरी, उपविभागीय कृषी अधिकारी पांढरकवडा, जिल्हा कृषी अधिकारी यवतमाळ, जाधव, BTM झरी, नीलेश भोयर तालुका कृषी मित्र , राजू मोहितकर नगरपंचायत अध्यक्ष, सर्व मंडळ अधिकारी व कृषी सहायक, तसेच सर्व कृषिमित्र व शेतकरी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.