पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन

संपर्क साधण्याची आज शेवटची तारीख

0
सुशील ओझा, झरी: केंद्र सरकारची शेतक-यांसाठी असलेली पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. या योजनेत पात्र शेतकरी कुटुंबा करीता 2:00 हे. आर. पर्यत धारण मर्यादा होती, ती मर्यादा केंद्रशासनाने शिथील केली असुन या योजने अतंर्गत सरसकट (नोकरदार व पेन्शन धारक शेतकरी सोडून) सर्व पात्र कुटुंबाना प्रती वर्षी तीन समान हप्त्यांमध्ये ६०००/- रु वितरीत करणेबाबत कृषी आयुक्त कार्यालया मार्फत १३ जून रोजी च्या पत्रान्वये सुचित करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने तालुक्यातील तमाम शेतकरी बांधव यांनी आपले बँक खाते क्रमांक व बँक आय. एफ. सी. आय कोड सह पासबुक व आधार कार्ड यांची झेराँक्स प्रत, मोबाईल क्रमांक तलाठी कार्यालयात अथवा ग्रामसेवक किंवा कृषिसहाय्यक आपल्या गावासाठी नेमुन देण्यात आलेले आहे यांचे कडे तात्काळ जमा करावे. शेतक्यांची संपूर्ण माहिती २४ जून पर्यत शासनापर्यंत देणे गरजेचे आहे करिता शेतकऱ्यांनी सदर योजनेची कागदपत्र जसे बँक खाते क्रमांक व आधार कार्ड क्रमांक यांची झेराँक्स प्रत न आणून दिल्यामुळे सदर योजने पासुन आपण वंचीत राहणार नाहीत यांची काळजी घेऊन सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महसूल व कृषी विभागातर्फे करण्यात आली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.