खांदल्याजवळ ट्रक आणि दुचाकीची धडक

कुर्ली येथील एकाचा मृत्यू

0
विलास ताजने, वणी : शिरपूर ते खांदला दरम्यान दुचाकी आणि ट्रकची धडक होऊन दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना दि.२५ मंगळवारी दुपारी तीनच्या दरम्यान घडली. गणपत उर्फ अविनाश सीताराम पानघाटे वय ५० रा. कुर्ली असे मृतकाचे नाव आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गणपत पानघाटे हे वणीतील कामे आटोपून कुर्लीला दुचाकीने जात होते. शिरपूर ते खांदला दरम्यान वळणावर विरुद्ध दिशेने येणारा ट्रक क्र. एम एच ४० बीजी ०२१३ आणि दुचाकी क्र. एम एच २९ पी ३४५४ या वाहनांची धडक झाली. यात पानघाटे हे गंभीर जखमी झाले. वणीला उपचारासाठी आणतांना त्यांचा मृत्यू झाला. वणीच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
पानघाटे यांचा मुळगाव गोवारी पार्डी असून ते कुर्ली येथे वास्तव्यास होते. अविनाश पानघाटे हे कबड्डीपटू होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. अविनाशच्या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.