एकापेक्षा एक डान्सने रंगली स्पर्धा, सकाळी पालखी सोहळा

'हे' ठरलेत डान्स स्पर्धेचे विजेते, आज संध्या. सुंदरकांड व रात्री जन्मोत्सव सोहळा

बहुगुणी डेस्क, वणी: रविवारचा संपूर्ण दिवस डान्स स्पर्धांनी गाजवला. तर संध्याकाळी कवि संमेलन रंगले. या दोन्ही कार्यक्रमाला वणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. आज सोमवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा रंगणार आहे. स. 10 वा. श्रीकृष्ण पालखी यात्रेने याची सुरुवात होणार आहे. चोरडिया निवास येथून वाजत गाजत ही पालखी निघणार आहे. पालखीची सांगता श्रीकृष्ण मंदीर येथे होणार आहे. संध्या. 6 वा. अमृत भवन येथे सुंदरकाड पाठ व जप होणार आहे. यात श्रीकृष्ण लीलांचे नाट्य रुपांतरण सादर केले जाणार आहे. रात्री 10 वा. अमृत भवन येथे मुख्य श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा होणार आहे. या जन्मोत्सवात अभिषेक व श्रीकृष्ण श्रुंगार, बालगोपाल दर्शन, मटकी फोड इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे.

डान्स स्पर्धेची धूम 
अमृत भवन येथे दु. 2 वाजता भक्तीगीत व देशभक्ती गितांवर आधारित सोलो व गृप डान्स स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत 100 पेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. यावेळी एकापेक्षा एक नृत्याचा आनंद घेतला. गट अ वय वर्ष 1 ते 5 या गटात प्रथम पारितोषिक पूर्वा कोरडे तर अनया लेडांगे, वेदिका नागपूरे यांना अनुक्रमे द्वितिय व तृतिय क्रमांक मिळाला. गट ब वयोगट 6 ते 10 या वयोगटात प्रथम बक्षिस पूर्वा कोल्हे, द्वितीय योगन्या वासेकार तर तृतिय बक्षिस रक्षक पेंदोर यांनी पटकावला.

गट क वयोगट 11 ते 18 यात प्रथम क्रमांक मिताली पांडे, द्वितिय मिथी राऊत तर तृतिय क्रमांक कृष्णा जैन यांनी पटकावला. गृप डान्स स्पर्धेत देवीचा गोंधळ सादर करणा-या सरस्वती गृपने प्रथम पारितोषिक पटकावले. तर कृष्णलीला सादर करणा-या कृष्णा गृपने द्वितिय तर पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करणा-या गोंडरानी गृपने तृतिय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे परिक्षण जतिन राऊत, कशिष पुन्यानी, सीमा सोनटक्के व अशोक सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कल्पक चिंचोळकर यांनी केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

संध्याकाळी 6 वाजता नामवंत कविचे कवी संमेलन रंगले. यावेळी कविंनी विविध विषयांवर एकापेक्षा एक कविता व शेरो शायरी सादर केल्यात. प्रेक्षकांनी या मैफलीला चांगलीच दाद दिली. कवि संमेलनाचे सूत्रधार शैलेंद्र ठाकरे होते. कार्यक्रमाला माजी खासदार व ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्या सकाळी गोपाळकाला तर संध्याकाळी भव्य अशी शोभायात्रा निघणार आहे. 

Comments are closed.