विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमी साजरी

चिमुकल्यांनी केली राधाकृष्णाची वेशभूषा

0

संतोष ढुमणे, वणी: कायर येथील विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला चिमुकल्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाची वेशभूषा केली होती.

Podar School 2025

16 ऑगस्टला विद्यानिकेतन शाळेत जन्माष्टमी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मुख्याध्यापिका सरला ठावरी होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षिका मेंधळकर व राजुलवार ह्या होत्या. कार्यक्रमाचे संचलन सचिन पिंपळकर यांनी केले तर आभार काशिनाथ आत्राम यांनी मानले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

(आर्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये वेशभूषा स्पर्धा)

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक सुजीत चौधरी, रतन जेऊकर, सुनील धोबे, प्रमोद गौत्रे, सुवर्णा पिंपळकर, अश्विणी पिंपळकर, स्मीता राजूरकर, शिक्षिका पावडे, शिक्षिका पानघाटे आणि शिकत्तेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.