कुणब्यांची पाखरं आली हजारोंच्या संख्येनी एकत्र 

वणीत पहिल्यांदाच निघाला कुणबी समाजाचा अफाट मोर्चा

0

वणी (रवि ढुमणे): शासनाच्या मागासवर्ग आयोगाने 49 व अहवाल सादर केला. यात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने एकशे तीन जातींना क्रिमिलेअर तत्वातून वगळण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यात कुणबी जातीचा मात्र जाणीवपूर्वक समावेश केला नसल्याने या अन्यायाच्या विरुद्ध एकत्र येऊन दडपशाही धोरणाविरुद्ध वणी उपविभागातील कुणबी बांधव एकत्र आले.

 

वणी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधून मोर्चात रुपांतर करून हा मोर्चा शासकीय मैदानात अफाट जनसमुदायात दाखल झाला आहे.  कुणबी समाजाला शासनाने नॉन क्रिमिलेअर अटीतून अन्याय करीत बाद केला आहे.   आजवर कुणब्याचा केवळ निवडणुकी करिता वापरच करण्यात आला आहे.

 

आज मोर्चासाठी मिळेल त्या वाहनाने कुणबी बांधव वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती च्या आवारात एकत्र आले.  कुणबी संघर्ष समिती ने नियोजनबद्ध कार्यक्रम आखून अगदी शांततेच्या मार्गाने मोर्चाला सुरुवात झाली.

 

बाजार समिती मधून निघालेल्या मोर्च्यात कष्टकरी, शेतकरी, डॉक्टर,वकील,प्राध्यापक, व्यावसायिक व सर्वच स्तरातील कुणब्यांचा जनसमुदाय एकत्र आला.  थेट बाजार समिती ते गांधी चौक या भागात रांगा लागल्या होत्या आणि  शिस्तबद्ध रीतीने शहरातून मोर्चा निघाला.  महिलांची संख्या ही लक्षणीय होती.

Leave A Reply

Your email address will not be published.