कुंडी येथील शेतक-याच्या शेतात लागली आग
सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील कुंडी येथील शेतकरी लालू मलकू दडांजे यांच्या शेतातील कोठ्याला आग लागून शेतातील ३० हजार किमतीचे शेतीउपयोगी अवजारे व जनावरांचा चारा जळून भष्मसात झाला. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. लालू अत्यंत गरीब शेतकरी असून त्यांच्यासमोर आता जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लालू दडांजे यांचे शेत गट नंबर ८४ टेंभी शिवारात असल्याने आपल्या शेतात काम करून तो कुंडी येथील राहत्या घरी दुपारी परत आला. सायंकाळला शेताच्या शेजारील व्यक्तीने फोन करून तुझ्या शेतातील कोठा जळत असल्याची माहिती त्यांना दिली. माहिती मिळताच लालू दडांजे यांनी गावातील काही लोकांना घेऊन रात्री शेतात गेले असता, आगीत कोट्यातील जनावरांचा चारा व शेतीची शेतीउपयोगी वस्तु जळत असल्याचे दिसले. ही आग कशा लागली की कुणी लावली याबाबत तर्क वितर्क काढल्या जात आहे.
लालू हा अत्यन्त गरीब शेतकरी आहे. त्यातच आता कोठ्याचं नुकसान झाल्याने त्याच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. कोठ्यात सोयाबीन कुटार, तुरीचे कुटार, चना कुटार आणि शेतीचे सर्व समान होते. सदर आगीची बातमी समजल्या नंतर आंबेझरी बिट चे तलाठी शिंदे, कोतवाल बाबाराव आडे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
पंचनामा करीत असताना कुंडी येतील गणेश सुरपाम, निळू आत्राम, मनोहर मडावी व इतरही टेम्भी येतील नागरिक होते. आज लालू जवळ जनावरे असल्याने त्यांना खाण्यासाठी चारा नाही. ज्यामुळे जनवरंच मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.