अपघात : गिट्टी क्रॅशर मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

मोहदा येथील श्री साई मिनरल्स मधील घटना

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत मोहदा येथे क्रॅशर मशीन मध्ये अडकुन कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार 17 मे रोजी मध्यरात्री दरम्यान घडली. बिसनलाल चरणजीत यादव (19) रा.जि. अनुपुर, मध्यप्रदेश असे अपघातात मृत कामगाराचा नाव आहे. मोहदा येथील श्री साई मिनरल्स क्रॅशर प्लांटमध्ये ही दुर्देवी घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर येथील सुनील बियाणी यांचे मोहदा येथे गिट्टी क्रॅशरचा प्लांट आहे. या प्लांटवर बिहार व मध्यप्रदेश येथील कामगार कामावर आहे. मृतक बिसनलाल हा क्रॅशर मशीन हेल्पर म्हणून काम करीत होता. मंगळवारी रात्री 11 वाजता सुमारास हॉपरमध्ये अडकलेला दगड काढत असताना अचानक दगडाचा लाट खाली सरकला. आणि दगडासोबतच हेल्पर बिसनलाल क्रॅशर मशीन मध्ये अडकल्याने त्याच्या शरीराचा चेंदामेंदा झाला.

Podar School

दुर्घटनेबाबत प्लांट प्रबंधक यांनी बुधवारी सकाळी शिरपूर पोलीस ठाण्यात माहिती दिली. शिरपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मशीनमध्ये अडकलेल्या हेल्परचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाचा पंचनामा करुन पोस्टमार्टमसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास शिरपूर ठाणेदार गजानन करेवाड करीत आहे.

Sunrise
Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!