खळबळ – राजूर फाटा येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

जितेंद्र कोठारी, वणी : वणी यवतमाळ मार्गावर राजूर फाटा परिसरात अंदाजे 35 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा अर्धनग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. राजूर रिंगरोड जवळ बरडीया यांचे पेट्रोल पंपाच्या मागे बुधवार 18 मे रोजी दुपारी ही घटना उघडकीस आली. मृतक कोण आहे ? तिथे कशासाठी आला ? त्याच्या अंगावर कपडे का नाही? तसेच त्याच्या मृत्यूचा कारण काय ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.

प्राथमिक चौकशीत पोलिसांनी पेट्रोल पंप येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर व्यक्ती मंगळवारी दुपारी 1.30 वाजता पायी चालून येऊन पेट्रोल पंपाचे मागील बाजूस ताराच्या कुंपणाजवळ झाडाखाली बसत असताना दिसून आला. मात्र आज त्याच ठिकाणी बसलेल्या अवस्थेतच त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे…

Podar School

मृत युवकाचे बसलेल्या अवस्थेत तसेच अर्धनग्नावस्थेत मृतदेह मिळाल्यामुळे अनेक शंका कुशंकेला पेव फुटले आहे. मात्र प्राथमिकदृष्ट्या त्याचा मृत्यू उष्मघातामुळे झाल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या तीव्र लाहीमुळे युवकाने अंगावरील कपडे स्वतः काढले असेल असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ओळख पटविण्याचे आवाहन ..
राजूर (कॉलरी) येथील चुना भट्टयांवर शेकडो परप्रांतीय कामगार आहे. चुना भट्टा परिसरातच झोपड्या बांधून ते राहतात. त्यामुळे मृतक परप्रांतीय कामगार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन वणी पोलिसांनी केले आहे.

Sunrise
Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!