लखबीर सिंह यांच्या भजनाने वणीकर मंत्रमुग्ध, छत्री घेऊन कार्यक्रमाचा आस्वाद

खाटू शाम मंदिरासाठी विजय चोरडिया यांची 4 लाख 11 हजारांची देणगी

बहुगुणी डेस्क, वणी: कार्यक्रमामुळे मैदान खचाखच भरले होते. मात्र ऐन कार्यक्रमाच्या वेळेवर पावसाची रिपरिप सुरु झाली. कार्यक्रम होणार की नाही याची कोणतीही खात्री नव्हती. मात्र काही वेळाने पावसाचा जोर कमी झाला आणि वणीकरांनी छत्री घेऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. गुरुवारी दिनांक 22 ऑगस्ट रोजी लखबीर सिंह लक्खा यांचा कार्यक्रम पार पडला. एकापेक्षा एक गितांनी वणीकर चांगलेच मंत्रमुग्ध झाले. यावेळी विजय चोरडिया, ऍड. कुणाल चोरडिया यांनीही भजनाच्या तालावर ठेका धरला. तर एका गाण्याला ऍड कुणाल चोरडिया यांनी कोरस देखील दिला. कार्यक्रमातच विजय चोरडिया यांनी खाटू शाम मंदिराच्या जीर्णोधारासाठी 4 लाख 11 हजार रुपयांची देणगी सुपुर्द केली.

पावसामुळे कार्यक्रमाला नियोजित वेळेपेक्षा एक ते दिड तास उशीर झाला. मात्र प्रेक्षकांचा उत्साह कायम होता. कार्यक्रमाची सुरुवात ‘अरे द्वारपालो कन्हय्या से कह दो’ या भजनाने झाली. त्यानंतर लखबीर यांनी 3-4 श्रीकृष्णाचे भजन गायले. भगवान श्री कृष्णाच्या जीवन प्रवास मांडणा-या भजनाला प्रेक्षकांनी विशेष दाद दिली. त्यानंतर किजो केसरी के लाल, महादेवाचे भजन झाले. कार्यक्रमाची सांगता देवीच्या गाण्याच्या मिडलेनी झाली.

ऍड कुणाल चोरडिया यांचा कोरस, वणीकरांचे नृत्य
सुरुवातीच्या पहिल्या गाण्यानंतर वणीकरांनी लखबीर यांच्या भजनावर ठेका धरायला सुरुवात केली. ‘शाम माय डियर मस्ताना’ या भजनाला ऍड कुणाल चोरडिया यांनी कोरस देत साथ दिली. ‘श्री राम जानकी’ या भजनाला प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला. यावेळी विजय चोरडिया, ऍड. कुणाल चोरडिया यांनी स्टेजवर ठेका धरला. आपापल्या जागेवर थिरकणारे प्रेक्षक विजय चोरडिया यांच्या आवाहनानंतर स्टेज समोर आले. त्यांनी नाचून जगरात्याचा आनंद लुटला. ‘किजो केसरीके लाल’ या भजनाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमा दरम्यान जन्माष्टमी समितीच्या सल्लागार समिती तर्फे लखबीर सिंह लक्खा यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाच्या मध्ये शासकीय नोकरीत यश संपादन करणा-या तीन विद्यार्थ्यांचा मान्यवरांतर्फे सत्कार करण्यात आला. दरम्यान विजय चोरडिया यांनी खाटूशाम मंदिराच्या जीर्णोदरासाठी 4 लाख 11 हजार रुपये देणगी सुपुर्द केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जन्माष्टमी समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.