पुरुषोत्तम नवघरे, वणी: लालपरी अर्थात राज्य परिवहन मंडळाची बस कदाचित रागाने लाल झाली असावी, असा विचार विद्यार्थी आणि नागरिेकांच्या मनात येत असावा. यामुळे सर्वसाधारण ग्रामीण भागांतील शहरात शिकणारे विद्यार्थी आणि नागरिकांची ससेहोलपट होत आहे. तालुक्यातील वणी-भालर मार्गे बेलोरा राज्यमार्ग घुग्घुस हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. या रस्त्यावर लालगुडा, धोपटाळा, भालर, लाठी, बेसा, निवली, सुंदरनगर, तरोडा, निलजई, बेलोरा, इत्यादी गावे येतात. या अनेक गावांतून शहरात रोज ये-जा करणारे विद्यार्थी आहेत. तसेच शहर ही मुख्य बाजारपेठ आहे. म्हणून गावातील नागरीक, विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरीक, छोटे व्यवसायिक आणि दैनदिन प्रवासी यांना प्रवासाचं सार्वजनिक साधन नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो. काही विद्यार्थी तर शहरात भाड्याची खोली करून राहतात. त्याचा आर्थिक फटका त्यांना बसत आहे.
शैक्षणिक, व्यावसायिक आणि अन्य कारणांसाठी यांना वणी बाजारपेठ, घुग्घूस, चंद्रपूर जावं लागतं. सध्या हा प्रवास खाजगी वाहनांनी करावा लागतो. जो धोकादायत तसाच खर्चिकही आहे. याचा थेट परिणाम त्यांचे कामकाज व विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. या रस्त्यादरम्यान सुंदरनगर तरोडा येथे इंग्रजी माध्यमाची शाळा भालर येथे आहे. या ठिकाणी जाण्यास विद्यार्थ्यांवर खाजगी वाहनांमुळे जास्तीचा आर्थिक भार पडतो. त्यांना एस.टी.सारखी सवलत मिळत नाही. सोबतच वणी, घुग्घूस चंद्रपूर येथे महाविद्यालयीन, नर्सिंग, तांत्रिक या ठिकाणी बससेवा नाही. राज्य परिवहन मंडळाचे ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ हे ब्रिदवाक्य आहे. म्हणून सगळे याची अपेक्षा करीत आहेत. हा परिसर कोळसा आणि अन्य खनिजांनी संपन्न आहे. शासनाने सार्वजनिक वाहतुकीमध्ये विद्यार्थी, दिव्यांग, महिला, ज्येष्ठ नागरीक इत्यादींकरिता विविध प्रवास सवलत जाहीर केल्यात. परंतु या मार्गांवरुन बससेवा नसल्याने नागरीकांना शासनाच्या या सुविधांचा फायदा होत नाही.
ही विद्यार्थी आणि नागरीकांची होणारी गैरसोय लक्षात घेतली जावी. ही अपेक्षा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी व्यक्त केली, वणी तालुक्याच्या ठिकाणी व चंद्रपुर जिल्ह्याच्या ठिकाणी विविध शैक्षणिक वर्षे २०२४-२०२५ व इतर सुविधाचा लाभ विद्यार्थी व नागरीकांना व्हावा अशीही मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे महामंडळाचे उत्पन्न वाढीस मदत होईल. या संदर्भात विजय पिदुरकर यांनी निवेदन दिलं आहे.
Comments are closed.