लालगुड्यात तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

अनैतिक संबंधातून हत्या केल्याची पोलिसात तक्रार

0

वणी(रवि ढुमणे): शुक्रवारची पहाट वणीसाठी एक थरारक बातमी घेऊन उगवली. वणी पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या लालगुडा येथे एकाने दगडाने ठेचून एका तरुणाची हत्या केली. या थरारक प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की शहरालगत असलेल्या रजा नगर लालगुडा भागात एक घटस्फोटित महिला राहत होती. सोबतच अशोक येलनवार हा 35 वर्षीय तरुण सुद्धा मुलासमवेत त्याच परिसरात राहात होता. अशोकची पत्नी त्याला सोडून निघून गेली होती. परिणामी घटस्फोटित महिलेशी अशोक चे सूत जुळले, दोघेही एकमेकांना निर्जनस्थळी भेटत होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या अनैतिक संबंधाची कुणकुण घटस्फोटित महिलेचा भाऊ मंगेश बोरीकर (30) याला लागली. अशोक नळ फिटिंग चे कामे करीत होता तर मंगेश एमआयडीसी मध्ये मेकॅनिक होता. मंगेशने अशोकला बरेचदा समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे संबंध अधिकच दृढ होत गेले.

गुरुवारी रात्री मंगेश दारू पिऊन होता. तो कामावरून घरी आला. त्याला बहीण घरात दिसली नाही. म्हणून तो त्यांना शोधण्यासाठी निघाला. रजा नगर भागातील एका घराच्या आडोशाला अशोक व घटस्फोटिता मंगेशला दिसली. मंगेशचा माथा भडकला. त्याने अशोक वर हल्ला करून त्याला खाली पाडले व दगडाने ठेचून त्याच्या डोक्याला छिन्नविच्छिन्न केले.

या घटनेची माहिती ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना मिळताच ते पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. यातील प्रमुख असलेल्या मंगेशला रात्रीच ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. शेवटी अनैतिक संबंधातून अशोकचे लेकरं मात्र पोरकी झाली. अशोक चा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. या घटनेची तक्रार अशोकच्या भावाने पोलिसात दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.