जब्बार चीनी, वणी: पाच वर्षीय एलएलबी (कायदा) या अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व पात्रता परीक्षेसाठी आता एक दिवसाची आणखी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे बुरांडा येथील नुरजहाँ बेगम सलाम अहमद (एनबीएसए) वुमन्स लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळाली आहे. सोमवारी दिनांक 7 सप्टेंबर रोजी केवळ एका दिवसासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. शिवाय इच्छुक विद्यार्थ्यांचा अर्ज मोफत भरून देखील दिला जाणार आहे. तरी ज्या महिलांनी आधी अर्ज केला नसेल त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मोफत अर्ज भरून देण्याची व्यवस्था
लॉ (कायदा) क्षेत्रात करिअर करण्याकरिता लॉ प्रवेश पूर्व पात्रता परीक्षा देणे आवश्यक आहे. महाविद्यालयाच्या वतीने ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता बुरांडा येथील महाविद्यालयात तसेच वणी येथील रझ्झाक मंझिल डॉ. आंबेडकर चौक येथे मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय महाविद्यालयात प्रवेश पूर्व परीक्षेची तयारी देखील करून दिली जाणार आहे.
केवळ एका दिवसासाठी संधी
बॅचलर ऑफ लॉ म्हणजेच एलएलबी हा अभ्सासक्रम तीन आणि पाच वर्षांचा आहे. 12 वी नंतर पाच वर्ष व पदवी नंतर हा अभ्यासक्रम 3 वर्षांचा आहे. 12 वि नंतर च्या प्रवेशाची अंतिम मुदत याआधीच संपली आहे. मात्र शिक्षण विभागाने आणखी एका दिवसाची मुदत दिली आहे. त्यामुळे कायद्याचे शिक्षण घेण्यास इच्छुक असणा-या ज्या विद्यार्थ्यांनी आधी अर्ज केला नसेल त्यांना अर्ज करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. तरी या संधीचा फायदा घ्यावा.
– प्राचार्य, एनबीएसए लॉ कॉलेज, बुरांडा
वणी पासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या मारेगाव तालुक्यातील बुरांडा (खडकी) येथे नुरजहां बेगम सलाम अहेमद लॉ कॉलेज आहे. महाविद्यालयात पोहोचण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध आहे. प्रशस्त महाविद्यालय परिसर आहे. मुट कोर्ट, लायब्ररीची सुविधा, इंटरनेट सुविधा, कॉम्प्युटर लॅब इत्यादी सुविधा या महाविद्यालयात आहे.
अधिक माहितीकरिता संपर्क क्रमांक: 9960877996 8805060950 9404574358
बुरांडा येथील एनबीएसए लॉ कॉलेज हे भारतातील ग्रामीण भागात असेललं एकमेव महिला लॉ कॉलेज मानलं जातं. बुरांडा येथील लॉ कॉलेज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न आहे. तसेच बार काउंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली याची देखील या कॉलेजला मान्यता प्राप्त आहे. तरी परिसरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असे आवाहन कॉलेजच्या प्राचार्यांनी केले आहे.