लाव्याची शिकार करणारे वन विभागाच्या जाळ्यात

दुचाकीसह 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील चालबर्डी परिसरातील जंगलात लावेची शिकार प्रकरणी वनविभागाच्या कर्मचा-यांनी दोन युवकांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रविवारी ही घटना घडली आहे.

प्राप्त महितीनुसार 14 एप्रिलला जामनीचे क्षेत्रसहाय्यक दीपक लोखंडे हे आपले कर्मचारी यांना घेऊन चालबर्डी परिसरातील जंगल शिवारात गस्त घालत होते. त्यावेळी दोन युवक दुचाकी क्र एम एच 29, 9760 हे जाळे टाकून लाव्याची शिकार करत असल्याचे आढळले. शिकारमध्ये 24 लावे अड़कून असल्याचेही त्यांना दिसले. त्यावरून आरोपी अजय गुलशन पवार, प्रमोद काळे दोन्ही राहणार हिवरी या दोघांना अटक करुन त्यांना दुचाकीसह अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर वन्यजीवन संरक्षण आधिनियम 1972 चे कलम 9, 39, 44, 46, 48 अ, 51 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार जंगलातील वन्यपक्षी व वन्यप्राण्यांची शिकार करने व घरी पाळने गुन्हा असून शिकार करणा-यांना 3 वर्षांचा कारावास व 25 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. शिकारी जंगलातील तितर, लावे, मोर, हरण, चितळ, ससा, घोरपड, इतरही वन्यप्राणी व वन्यपक्षांचे शिकार करण्यात पटाइत आहे.

उन्हाळ्यात वन्यप्रान्यांना पिण्याकरीता पाणी मिळत नसल्याने गावाजवळील शेतात, नाल्याजवळ येत असल्याने शिकारी त्याजागेवर दबा धरून बसतात. वरील कार्यवाही क्षेत्रसहायक दीपक लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सुनील मेहेरे, दिनेश भोयर, महादेव सरोदे, विजय मेश्राम, संदीप बोड़खे, सुभाष पिकलिकवार, दिलीप चिकराम यांनी केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.