श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे शनिवारी उद्घाटन

शेतकरी मंदिर येथे रंगणार उद्घाटन सोहळा, ना. यशोमती ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

जितेंद्र कोठारी, वणी: येथील रंगनाथस्वामी अर्बन निधी लिमिटेडच्या प्रचंड यशानंतर आता वणीकरांच्या सेवेत श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था सुरू करण्यात येत आहे. या पतसंस्थेचे कार्यालय टागोर चौकातील स्टेट बँकेच्या बाजूला उघडण्यात आले आहे. या पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा शनिवार 4 जून रोजी सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. उद्घाटनपर सभा येथील शेतकरी मंदिरात आयोजित केली आहे.

या सोहळ्याला उद्घाटक म्हणून राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी खासदार सुरेश धानोरकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार वामनराव चटप, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी आमदार विश्वास नांदेकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे,

काँग्रेस कमिटीचे प्रफुल्ल मानकर, महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे राजूदास जाधव, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विनायक एकरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर, माजी जिल्हा परिषद सदस्या अरुणा खंडाळकर, अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीचे सहसचिव नितीन कुंभलकर, स्वावलंबी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार, माजी शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे, यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वंदना आवारी, इंदिरा सुतगिरणीचे अध्यक्ष सुनील कातकडे उपस्थित राहणार आहेत.

वणी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन रंगनाथस्वामी अर्बन निधी लिमिटेड वणीचे अध्यक्ष संजय खाडे व लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा संगीता खाडे यांनी केले आहे.

Comments are closed.