Job Alert: वणीतील लेंसकार्ट (Lenskart) आउटलेटमध्ये नोकरीची संधी

भारतातील टॉपची आयविअर कंपनी लेन्सकार्टचे शेवाळकर परिसरात लवकरच आउटलेट...

बहुगुणी डेस्क, वणी: भारतातील टॉपची आयविअर कंपनी लेंसकार्टचे वणीतील शेवाळकर परिसर लवकरच आउटलेट सुरू होणार आहे. त्यासाठी या आउटलेटमध्ये सेल्स विभागात भरती सुरू झाली आहे. आयविअर क्षेत्रात (ऑप्टीकल दुकानात) काम करणा-या किंवा कोणत्याही सेल्स, मार्केटिंग क्षेत्रात किमान 2 वर्षांचा अनुभव असणा-या  उमेदवारांना या पदासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवारांना मराठी सह इंग्रजी वाचता येणे आवश्यक व कॉम्प्युटरचा वापर करता येणे गरजेचे आहे. इच्छुक महिला व पुरुष उमेदवारांनी अधिक माहितीसाठी 9503765011 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा [email protected] या ईमेलवर आपला बायोडाटा सेंड करावा. लेंसकार्ट हा ऑप्टिकल क्षेत्रात भारतील एक विख्यात व अग्रगण्य ब्रँड असून केवळ मोठ्या शहरामध्ये या कंपनीची आउटलेट आहेत. वणीसारख्या शहरात हा ब्रँड येत असल्याने ग्राहकांना आता खरेदीसाठी एक उत्कृष्ट पर्याय उपलब्ध होणार आहे.

Comments are closed.