बहुगुणी डेस्क, वणी: राज्यात कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या महापुराने न भरून निघणारी हानी झाली आहे. लाखो परिवार रस्त्यावर आले आहे. आता त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे येथील लायन्स क्लब व लायन्स चारिटेबल ट्रस्टच्या वतीने एक लाखाची मदत देण्यात आली आहे. लॉयन्स शाळेच्या शाळेच्या नवीन इमारतीच्या उद्धाटनाप्रसंगी हा चेक देण्यात आला.
कोल्हापूर, सांगली व सातारा येथील नागरिकां संपुर्ण देशातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे सामाजिक संघटना, राजकीय पक्ष,नागरिक आपआपल्या परीने मदतीचे कार्य करीत आहे. रोटरी क्लब द्वारा वणीकरांकडून साहित्य संकलित केलेला ट्रक नुकताच पूरग्रस्त भागात पाठवण्यात आला आहे. या मदतीत आता लायन्स क्लब व लायन्स चारिटेबल ट्रस्टही मागे नाही. या संस्थेद्वारे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आला आहे. शाळेच्या नवीन इमारतीच्या उद्धाटना करिता आलेले आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांना धनादेश प्रदान करण्यात आला.
यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रांतपाल जीवन चंद्र निर्वाण, लायन्स क्लबच्या अध्यक्षा ललिता बोदकुरवार ,शाळा समितीचे अध्यक्ष शमीम अहेमद,सचिव महेंद्र श्रीवास्तवा, नरेंद्र नगरवाला,बलदेव खुंगर,चंद्रकांत जॉबनपुत्रा,रमेश बोहरा,दत्तात्रेय चकोर, प्राचार्य प्रशांत गोडे व शिक्षक उपस्थित होते.