पुन्हा देशी दारू आणि बार सुरू होताच मद्यपींची जत्रा
झरी (सुशील ओझा): सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार संपूर्ण भारतातील महमार्गावरिल देशी दारू दुकान, बियर बार, वाइन शॉप , बंद करण्याचा निर्णय झाल्याने १ एप्रिल २०१७ पासून दारुचे दुकाने बंद करण्यात आले होते. ज्यामुळे झरी तालुक्यातील मुकुटबन, झरी, पाटण, माथार्जुन, या सर्व गावातील एकूण १८ बियर बार व देशी दारू दुकान बंद झाले होते तर मांगली व सतपल्ली या दोन गावातील देशी दारुचे दुकान सुरु होते ज्यामुळे मद्यपि ची जशी जत्रा च या दोन गावाला पाहायला मिळत होती.
दुचाकी, चारचाकी, ऑटो, सायकलने दिवसभर मद्यपी दारू ढोसण्याकरिता जात होते . दारू पिण्याकरिता जाणाऱ्या अनेकांचे लहान मोठे अपघात सुधा होऊन जख्मी झाले. परंतु आज सरवोच्च न्यालयाच्या आदेशानुसार ज्या गावाची लोकसंख्या ५ हजार च्या वर आहे अश्या गावातील देशी दारू दुकान ,बियर बार, १ एप्रिल २०२८ पासून सुरु झाले असून त्यात मुकुटबन येथील एक वर्षापासून बंद असलेले ७ बियर बार व २ देशी दारू दुकान सुरु झाले. ज्यामुळे मद्यपी लोकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
मुकुटबन परिसरातील अडेगाव, खड़की, गणेशपूर, खातेरा, वेडद, तेजापुर, कोसारा, डोंगरगांव, आमलोन, मार्की, अर्धवन, पांधरकवडा(ल), रुइकोट, व इतर गावातून शेकडो लोक दारू पिण्याकरिता येत असून सकाळी १० वाजेपासून लोकांची गर्दी दारूच्या दुकानात दिसून येत आहे. यात युवकांची संख्या जास्त प्रमाणात दिसून येत आहे. दारू दुकासमोर दारू पिउन रस्त्यावर, चौकात, पडलेल्या अवस्थेत दिसत आहे तर तरुण युवक झगड़े भांडण करताना दिसत आहे. ज्यामुळे तरुण युवकांच्या भविषयाचे काय होणार असा प्रश्न पालक वर्गात केल्या जात आहे.
एक वर्ष दारू दुकाने बंद असताना लोकना ७ किलोमीटर मांगली गावातील दुकानातून दारू विकत घ्यावे लागत होते. त्याकरीता ऑटो भाड़े किवा मोटरसायकल च्या पेट्रोल चा खर्च लोकाना परवड नसल्याने पिनार्याची संख्या कमी झाली होती व झगड़े भांडण ही पाहायला मिळत नव्हते .परंतु मुकुटबन व इतर गावातील दारू दुकाने सुरु झाल्याने रस्त्यावर पिऊन पडणाऱ्यांची, झगड़े करणाऱ्यांची, तसेच भाईगिरी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे दारू दुकान सुरु होण्याच्या पूर्वी दुकासमोर अण्डे, पापड़, फूटने, सोडा व इतर दुकान मद्यपि लोकांच्या सेवेकरिता लागून तयार पाहायला मिळत आहे.