सिनेस्टाईल पाठलाग करून दारू तस्कराच्या आवळल्या मुसक्या

15 हजाराच्या दारुसह 3 लाखाचा मुद्देमाल जप्त

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील एमआयडीसी परिसरातून आज बुधवारी दिनांक 30 सप्टेंबर रोजी एका दारु तस्करास सिनेस्टाईल पाठलाग करून अटक करण्यात आली. त्याच्याकडून 15 हजार रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. ज्याची किंमत सुमारे 3 लाख रुपये इतकी आहे.

बुधवार सकाळी ठाणेदार वैभव जाधव कार्यालयात होते. त्यांच्या मोबाईलची रिंग अचानक वाजली. एका खबरीने त्यांना एमआयडीसी परिसरातून देशी दारुची तस्करी होणार असल्याची माहिती दिली. त्यांनी तात्काळ याबाबत डीबी पथकाला सूचना केली. 

डीबी पथक तात्काळ एमआयडीसी परिसरात गेले. दरम्यान आरोपी विशाल विनोद लोणारे (29) रा. सम्राट अशोक नगर वणी हा चारचाकीने (MH34 AA3373) दारू घेऊन जाताना त्यांना आढळून आला. पोलिसाची चाहूल लागताच आरोपीने गाडीचा वेग वाढवला. मात्र अखेर त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांनी त्याला इमडो कोल वॉशरी भालर रोड येथे गाठले.

त्याच्या गाडीची तपाणी केली असता त्यात प्लास्टिकच्या दोन बोरीमध्ये देशी दारुच्या 90 मीलीच्या 500 नग आढळून आले. ज्याची किंमत 15 हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी ही दारू व या गुन्ह्यात वापण्यात आलेले चारचाकी वाहन असा एकूण 3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

वणीच्या सत्र न्यायालयात आरोपीस हजर केले असता त्याची रवानगी यवतमाळ येथील कारागृहात करण्यात आली. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनी गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, पंकज उंबरकर, अमित पोयाम, रत्नपाल मोहाडे व दीपक वांड्रसवार यांनी केली.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.