विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी वणीतील देशमुखवाडीत राहणाऱ्या राहुल ठाकूरवार यांच्या घरी राज्य उत्पादन शुल्क विभागाणे धाड टाकून मोठा दारूसाठा जप्त केला. यामध्ये राहुल ठाकूरवार याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
28 जुलै रोजी राहुल ठाकूरवार याच्यावर यवतमाळ येथील गुंडांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली. त्यानंतर त्याच दिवशी राहुल ठाकूरवार यांच्या दुसऱ्या पत्नीने राहुलने प्रताडीत केल्याच्या आरोपावरून राहुलवर 498 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. या दोन्ही घटनेची शाई वाळते न वाळते तोच नवीन एक घटना राहुलच्या पुढे उभी ठाकली आहे.
शुक्रवारी सकाळी राहुल, त्याची पत्नी, आई सर्व घरी असता अचानक राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी धाड टाकली. त्यामध्ये राहुलच्या घरातून मॅकडोवेल नं 1 च्या 64 पेट्या, कॅनन 10000 बियर 1 पेट्या, किंगफिशर स्ट्रॉंग बियर 2 पेट्या, ऑफिसर चॉईस व्हिस्की 3 पेट्या, ऑफिसर चॉईस ब्लू , देशी दारू 4 पेट्या असा एकूण 5 लाख 33 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर माल राहुलच्या घरातील बेडरूम, किचन, हॉल मधून जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. यानुसार राहुल यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांनुसार 65(अ)(इ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
काय आहे राहुलचे म्हणणे ?
राहुलच्या म्हणण्यानुसार त्याने सदरची खोली वणीतील एका दारूविक्रेत्यास किरायने दिली होती. त्या ठिकाणी त्याच्याकडे काम करणारे कामगार राहत होते. तीन महिण्याअगोदार राहुलला ते कामगार घरी दारू बाळगताना दिसून आले असता त्याने रूम खाली करण्यास सांगितले. परंतु हा प्रकार पुन्हा होणार नसल्याची शाश्वती दिल्यानंतर त्या घरात एकच जण किरायच्या राहत होता. राहुल हा आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत गणेशपूर येथे राहतो त्यामुळे तो देशमुख वाडीतील घराकडे अधिक येत नाही. शिवाय 25 जुलै पासून ती इकडे आलाही नाही. याचीच संधी साधून अवैध दारू विक्रेत्यांनी त्याच्या घरात दारू ठेवली असल्याची माहिती राहुल याने वणी बहुगुणीशी बोलताना दिली.
दारू तस्करीचा पूर वाहत असताना घरी कार्यवाही का?
विशेष म्हणजे जेव्हापासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली तेव्हापासून वाणीतून दारूचा महापूर चंद्रपूर जिल्ह्यात वाहत आहे. आणि तेही राजरोसपणे सुरू आहे. आजच्या तारखेलाही अनेक तरुण या व्यवसायात काम करीत आहे. कित्येक ठिकाणी दारूची साठवणूक करून रात्रीच्या सुमारास दारूची तस्करी होत आहे. कित्येक बातम्या वृत्तपत्रातून प्रकाशित करण्यात आल्या. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाने कधीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही. मग आताच राज्य उत्पादन विभागाला जाग कशी आली. हे न उलगडणारे कोडे आहे.