Lodha Hospital

लोढा हॉस्पिटलचे सोमवारपासून सत्यसेवा हॉस्पिटलमध्ये स्थलांतरण

आता लोढा हॉस्पिटलच्या सर्व सेवा सुविधा झेडपी कॉलनीत

0

विवेक तोटेवार, वणी: वणीतील तेली फैल येथील लोढा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सोमवार दिनांक 21 सप्टेंबरपासून सत्यसेवा हॉस्पिटल झेड पी कॉलनी यवतमाळ रोड येथे स्थलांतर होत आहे. त्यामुळे रुग्णांनी आता नवीन ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन लोढा हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

लवकरच तेली फैल येथील लोढा हॉस्पिटल येथे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू होणार आहे. त्यामुळे तेथील हॉस्पिटल आता सत्यसेवा हॉस्पिटलमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोढा हॉस्पिटलमध्ये आधी असलेल्या सर्व सेवा सुविधा या नवीन जागीही राहणार आहे. यात प्रसुती व स्त्री रोग, सर्जरी, आयसीयू, अस्थिरोग, बालरोग, ओपीडी इत्यादी सेवा राहणार आहे.

Sagar Katpis

केवळ ठिकाण बदलेले असून सेवा तिच राहणार आहे. त्यामुळे रुग्णांनी यापुढे नवीन ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन लो़ढा हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!