लायन्स स्कूल व महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

जितेंद्र कोठारी, वणी : येथील लायन्स इं. मिडी. स्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात 76 वा स्वातंत्र्यदिन मोठया उत्साहात संपन्न झाला. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष लायन संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे उपस्थितीत लायन्स क्लब वणीचे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणनंतर राष्ट्रगाण, देशभक्तिपर समूहगान तसेच भारतीय स्वातंत्र्य लढयावर आधारित विदयार्थ्यांची उत्स्फूर्त भाषणे व विविधतेत एकता या विषयावर विदयार्थ्यांनी मूक नाटय सादर करून उपस्थितांना वैविध्यपूर्व भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले.

यावेळी दहावी व बारावीच्या परीक्षेत संपूर्ण तालुक्यातून प्रथम आलेल्या लायन्स स्कूलच्या विदयार्थीनी जान्हवी संजय पांडे व युक्ता प्रमोद बैद यांचा रोख, पारितोषक व सन्मानचिन्ह देउन गौरव करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन लायन्स क्लब वणी व लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ध्वजारोहणनंतर वणी लायन्स स्कूल परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

ध्वजारोहण व वृक्षारोपण कार्यक्रमात लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष लायन बलदेव खुंगर कोषाध्यक्ष लायन चंद्रकांत जोबनपुत्रा, लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन राजाभाउ पाथ्रडकर, सचिव लायन किशन चौधरी, लायन शमीम अहमद, नरेंद्रकुमार बरडिया, महेंद्र श्रीवास्तव, डॉ. आर.डी. देशपांडे, डॉ. के.आर लाल, प्रमोद देशमूख, पुरूषोत्तम खोब्रागडे, तुषार नगरवाला, प्राचार्य प्रशांत गोडे,  दिपासींग परिहार तसेच विदयार्थी, पालक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कु. पायल सिंग व रश्मी देशमूख यांनी केले तर आभार विजय भगत यांनी मानले.

Comments are closed.