पुरुषोत्तम नवघरे, वणी: संस्कृत वाङ्मयाची चर्चा महाकवी कालिदासांशिवाय अपूर्ण राहते. एकाहून एक अशा सरस कलाकृती कालिदासांनी संस्कृत वाङ्मयाला दिल्यात. त्यांच्या नावाने आषाढ्यातील पहिला दिवस कालिदास दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयांच्या संस्कृत विभागाने कालिदास दिन साजरा केला.
याप्रसंगी तनीषा सहारे (ऋतुसंहारम्), ईशा पारशिवे ( विक्रमोर्वशीयम्), सम्यक् तामगाडगे (अभिज्ञान शाकुंतलम्), साक्षी सोनेकर ( कुमारसंभवम् ), प्रतीक्षा जोशी ( मालविकाग्निमित्रम् ), या अंतिम वर्षाच्या आणि सुखदा बुजोणे ( रघुवंशम् ) या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी महाकवींच्या विविध साहित्यकृतींचा थोडक्यात परिचय करून दिला.
संस्कृत विभागप्रमुख विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी विविध दंतकथांच्या माध्यमातून महाकवींच्या जीवनाचा परिचय करून दिला. मेघदूतम् आणि त्यातील आषाढस्य प्रथम दिवसे… ! या उल्लेखाच्या आधारे साजरा होत असणाऱ्या कालिदास दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल करमरकर, कार्तिक देशपांडे आणि नितेश चामाटे या महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Comments are closed.